आता पद्मावतीचा नवा वाद उदयास आला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटावर मध्य प्रदेशमध्ये बंदी आणल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. ‘पद्मावती’वर बंदी आणण्याच्या मागणीसाठी राजपूत संघटनांनी त्यांना निवेदन दिले होते. रविवारी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता त्यानंतर ही मोठी घडामोड समोर येत आहे. १ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. काही राजपूत संघटनांचा या चित्रपटाला विरोध कायम आहे. राजपूत संघटनांकडून होणारा तीव्र विरोध आणि भन्साळी, दीपिका पदुकोणला मिळत असलेल्या धमक्या यांमुळेच प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक बदलांची कारणे देत चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews